काबूलमध्ये हल्ला, ३ विदेशींसह १० ठार
By Admin | Updated: August 23, 2015 03:34 IST2015-08-23T03:34:03+5:302015-08-23T03:34:03+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी नाटोच्या ताफ्याला लक्ष्य करून आत्मघाती कारबॉम्बस्फोट घडविण्यात आला. यात १० ठार, तर ६० जण जखमी झाले

काबूलमध्ये हल्ला, ३ विदेशींसह १० ठार
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी नाटोच्या ताफ्याला लक्ष्य करून आत्मघाती कारबॉम्बस्फोट घडविण्यात आला. यात १० ठार, तर ६० जण जखमी झाले असून मृतांत तीन परदेशी ठेकेदारांचा समावेश आहे.
खासगी शिनोझादा रुग्णालयाजवळ हा हल्ला झाला. स्फोट एवढा शक्तिशाली होता की, संपूर्ण शहरात त्याचा आवाज ऐकू गेला. या हल्ल्यात डझनभर वाहनांची हानी झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)