शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

Nepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 3:07 PM

के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश.

ठळक मुद्देके.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा.काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश.

कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरूच आहेत. नेपाळमध्ये गुरूवारी विरोधी पक्षाला नवं सरकार स्थापन करण्यास आवश्यक असलेलं बहुमत सिद्ध करण्यास अपयश आलं. यानंतर नेपाळच्या संसदेनं मोठा राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रुपात के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा सोपवली. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. तीन दिवसांपूर्वी ओली यांना संसदेच्या प्रतिनिधी सभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु यानंतर विरोधकांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानातील कलमानुसार प्रतिनिधी सभेत सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रूपात ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी ओली यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.  यापूर्वी विरोधकांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्यानं ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी विरोधकांना गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली होती. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांना सीपीएन माओवादचे अध्यक्ष पुष्पकमल दल 'प्रचंड' यांचं समर्थन मिळालं होतं. परंतु त्यांना जनता समादवादी पार्टीचं समर्थन मिळालं नाही. जेएसपीचे अध्यक्ष उपेन्द्र यागव यांनी देऊबा यांना समर्थन देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु पक्षाचे दुसरे अध्यक्ष महंत ठाकुर यांनी या प्रस्ताव फेटाळला. 

टॅग्स :NepalनेपाळParliamentसंसदPoliticsराजकारणprime ministerपंतप्रधान