जस्टीन बिबरने भारतीयांना दिला धोका, चाहते नाराज

By Admin | Updated: May 11, 2017 18:31 IST2017-05-11T18:27:21+5:302017-05-11T18:31:42+5:30

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्टला पाहायला हजारो लोक उपस्थित होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेल्या चाहत्यांना मात्र जस्टिनने निराश केल्याचे समोर आले आहे

Justin Bibber annoyed at the danger given to Indians, fans | जस्टीन बिबरने भारतीयांना दिला धोका, चाहते नाराज

जस्टीन बिबरने भारतीयांना दिला धोका, चाहते नाराज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आंतरराष्ट्रीय पॉपस्टार जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्टला पाहायला हजारो लोक उपस्थित होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेल्या चाहत्यांना मात्र जस्टिनने निराश केल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमावेळी त्याने फक्त लिप सिंक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून नाराजी व्यक्त केली आहे. काल नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या कन्सर्टला जवळपास 50 हजार प्रेक्षक उपस्थित होते.
जस्टिन आपल्याच काही गाण्यावर फक्त लिप सिंक करत आहे हे चाहत्यांना समजल्यानंतर त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार जस्टिन चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आला होता. पण 24 तासांत तो माघारी परतला. जस्टिनचे लिप सिंक प्रकरण समोर आल्यानंतर भारतातील त्याचा कॉन्सर्ट वादात अडकला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क काढले आहेत. लाइव्ह कार्यक्रमादरम्यान जस्टिन पाणी पित होता आणि तरी त्याचे गाणे सुरु होते. त्याचप्रमाणे कार्यकामच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जस्टिनचा कार्यक्रम सुरु होता त्यावेळी ट्विटरवर त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जात होती. काही वेळा साठी #LipSync हा हॅशटॅग ट्रेंडीगमध्ये होता.
जस्टिनच्या शोसाठी 4 हजारांपासून ते अगदी 25 हजारांपर्यंतच्या तिकीटांचा दर असूनही तिकीटांसाठी लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. नवीन मुंबई येथील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच ड्रोनच्या सहाय्याने सुरक्षेची काळजी घेतली गेली होती. सुरक्षेसाठी सुमारे 500 पोलीस आणि 25 पोलीस अधिकारीही घटनास्थळी हजर होते.

Web Title: Justin Bibber annoyed at the danger given to Indians, fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.