शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:28 IST

भारतातील इराणी दूतावासाने हे निवेदन प्रसिद्ध केले, यात, अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे...

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर मोठे हल्ले करत ते उद्ध्वस्त केली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सच्या सहाय्याने इराणच्या अणुकेंद्रांवर सुमारे १३ हजार किलो वजनाचे GBU-५७ बॉम्ब टाकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (AEOI) एक भावनिक आणि रोखठोक निवेदन जारी केले आहे. भारतातील इराणी दूतावासाने हे निवेदन प्रसिद्ध केले, यात, अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे आणि पुन्हा एकदा अणुकार्यक्रम सुरू करण्याची शपथ घेण्यात आली आहे.

इराणकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध - भारतातील इराणी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या या निवेदनात म्हणण्यात  आले आहे की, "गेल्या काही दिवसांत झिओनिस्ट शत्रूने केलेल्या क्रूर हल्ल्यांनंतर, आज सकाळी देशाच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अणुकेंद्रांवर क्रूर हल्ला करण्यात आला. हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, विशेषतः एनपीटीचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे ही कारवाई दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) उदासीनतेमुळे, नव्हे, त्यांच्या संगनमताने घडली आहे." 

यात पुढे म्हणण्यात आले आहे, "अमेरिकन शत्रूने, व्हर्चूअल सॅटेलाइट फोटोच्या माध्यमाने आणि आपल्या राष्ट्रपतीच्या आदेशाने संबंधित ठिकाणांवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जी सुरक्षा करार आणि एनपीटीनुसार सातत्याने IAEA च्या देखरेखीत आहे. आशा आहे की, अंतरराष्ट्रीय समाज "जंगली नियमां" मुळे, निर्माण झालेल्या या अराजकतेचा निषेध करेल आणि इराणला त्याचा वैध अधिकारांचा दावा करण्यात समर्थन देईल."असं होतं अमेरिका-इस्रायलचं प्लॅनिंग -रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे साथ दिली. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणली गेलेली होती. तसेच, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध