शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:41 IST

‘क्वांटम टनलिंग’च्या शोधासाठी सन्मान

स्टॉकहोम : यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट आणि जॉन मार्टिनिस या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. स्वीडनमधील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.

‘मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग व एनर्जी क्वांटायझेश’मधील संशोधनाला पुरस्कार दिला गेला आहे. या शोधामुळे वैज्ञानिकांना मोठ्या प्रणालींमध्ये क्वांटम टनेलिंग कसे कार्य करते, हे समजून घेणे व नियंत्रित करणे शक्य झाले. 

मिशेल एच. डेवोरेटमूळ फ्रान्सचे, सध्या अमेरिकन शास्त्रज्ञक्वांटम इलेक्ट्रो-डायनेमिक्स,सुपरकंडक्टिंग क्युबिट्समध्ये संशोधन

जॉन एम. मार्टिनिसअमेरिकन शास्त्रज्ञ,क्वांटम इलेक्ट्रो-डायनेमिक्स सुपरकंडक्टिंग क्यूबिट्स, क्वांटम कंप्यूटिंगमध्ये संशोधन

जॉन क्लार्कमूळ इंग्लडचे, सध्या अमेरिकन शास्त्रज्ञसुपरकंडक्टिव इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम टँलिंग आणि ऊर्जा क्वांटाइजेशनमध्ये संशोधन

क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग म्हणजे काय?क्वांटम टनेलिंग ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात सूक्ष्म कण एखाद्या अडथळ्याला (बॅरिअरला) धडकून परत न येता थेट त्या अडथळ्यातून आरपार जाऊन पुढे सरकतात. पारंपरिक भौतिकशास्त्रानुसार हे अशक्य मानले जाते.  आपण पाहतो की चेंडू भिंतीवर आदळला तर तो परत येतो; पण क्वांटम जगतातील लहान कण कधी कधी ती भिंत भेदून दुसऱ्या बाजूस पोहोचतात. यालाच क्वांटम टनलिंग म्हणतात.

नोबेल समितीचे म्हणणे... नोबेल समितीचे अध्यक्ष ओले एरिक्सन म्हणाले, “शंभर वर्षांपूर्वी विकसित झालेली क्वांटम मेकॅनिक्स आजही नवनवीन शोधांमुळे आपल्याला अचंबित करते.  यंदाच्या नोबेल विजेत्यांच्या शोधामुळे भविष्यात सुपर सुरक्षित कोड्स (क्वांटम क्रिप्टोग्राफी), अतिवेगवान संगणक (क्वांटम कॉम्प्युटर्स) आणि अतिशय अचूक सेन्सर (क्वांटम सेन्सर्स) बनविणे शक्य होईल.”

English
हिंदी सारांश
Web Title : John Clarke, Michel Devoret, John Martinis win Physics Nobel

Web Summary : John Clarke, Michel Devoret, and John Martinis won the Physics Nobel for quantum tunneling research. Their work enables understanding and controlling quantum tunneling in large systems, paving the way for advanced technologies.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार