राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:12 PM2024-03-09T15:12:33+5:302024-03-09T15:13:29+5:30

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असं काय बोलले... जाणून घ्य

Joe Biden microphone was on by mistake gossip leaked while talking about Israel Pm Benjamin Netanyahu Hamas War Gaza | राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

Joe Biden Benjamin Netanyahu, Israel Hamas War इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर नाराज आहेत. दिवसेंदिवस त्यांची ही नाराजी वाढतच चालली असून, नुकत्याच झालेल्या एका संभाषणातून ही बाब समोर आली आहे. बायडेन यांनी एका खासदाराशी केलेल्या संभाषणात नेतन्याहू यांच्याबाबत आपले मत व्यक्त केले. पण या संभाषणादरम्यान माईक चालूच राहिला होता आणि त्यामुळे त्यांचे शब्द सर्वांनीच ऐकले. गुरुवारी रात्री 'स्टेट ऑफ द युनियन' भाषणानंतर सभागृहात सिनेटर मायकेल बेनेट यांच्याशी बोलताना बायडेन यांनी ही टिप्पणी केली.

बेनेट यांनी बायडेन यांचे भाषणाबद्दल अभिनंदन केले आणि गाझामधील वाढत्या युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच नेतन्याहू यांच्यावर दबाव आणून युद्धाला विराम घालण्याचे प्रयत्न करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना आवाहन केले. राज्य सचिव अँटनी ब्लिंकन आणि परिवहन मंत्री पीट बुटिगीग यांनीही संक्षिप्त संभाषणात भाग घेतला. यानंतर बायडेन यांनी नेतन्याहू यांचे आडनाव वापरले आणि म्हणाले, 'मी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सांगितले आहे की, याची (कदाचित युद्धासंदर्भातील हल्ले) पुनरावृत्ती करू नका. तुम्हांला आणि मला मोकळेपणाने बोलावे लागेल.' यानंतर जवळच उभ्या असलेल्या राष्ट्रध्यक्षांच्या सहाय्यकाने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्याने बायडेन यांना कदाचित माहिती दिली की मायक्रोफोन अद्याप सुरू आहे.

घडलेल्या प्रकारावर नंतर बोलताना म्हणाले की, 'मी इथे हॉट माइकवर आहे. चांगले आहे.' शुक्रवारी या टिप्पण्या मान्य करून, त्यांनी खेळकर पद्धतीने पत्रकारांना सांगितले की ते त्यांचे संभाषण 'गुप्तपणे' ऐकत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष आता जाहीरपणे नेतान्याहूंबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. गुरुवारी आपल्या भाषणात त्यांनी इस्रायलला हमासविरुद्धच्या मोहिमेत निष्पाप नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Joe Biden microphone was on by mistake gossip leaked while talking about Israel Pm Benjamin Netanyahu Hamas War Gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.