शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

जेएनयूच्या शिरपेचात नोबेल पुरस्काराचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 4:37 AM

अभिजित बॅनर्जी माजी विद्यार्थी : अर्थशास्त्रात केले एम.ए.

नितीन नायगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अभिजित बॅनर्जी यांना ‘नोबेल’ जाहीर झाल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे ते जेएनयूचे पहिलेच माजी विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे.

कोलकाता येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिजित बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमए इकॉनॉमिक्स) प्रवेश घेतला. त्यांनी काही वर्षांपूर्वी १९८१ ते १९८३ या कालावधीत जेएनयूमधील आठवणींना एका कार्यक्रमात उजाळा दिला होता. जेएनयूतील कार्यक्रमात अर्थशास्त्रातील जागतिक दृष्टिकोनांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला होता. विद्यापीठाला नाव कमावून देणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांमध्ये अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होतो.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक, जयती घोष, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन यांच्यासोबत बॅनर्जी यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो.

अभिजीत बॅनर्जी व प्रसिद्ध राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव जेएनयूतील दिवसांमध्ये वर्गमित्र होते. यापूर्वी अर्थशास्त्रासाठी नोबेल पटकाविणारे अमर्त्य सेन दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक होते. त्यामुळे दिल्लीच्या वाट्याला दुसऱ्यांदा अर्थशास्त्राचे नोबेल आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॅनर्जी यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर जेएनयूतील अर्थशास्त्र विभागात आनंदाचे वातावरण होते. कुलगुरू प्रो. जगदीश कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू का प्रॉडक्ट है’ या स्लोगनसह सोशल मिडियावरून संदेश पाठविले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टष्ट्वीटवरून बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिमा मलिन करणाºयांना चपराकअभिजित बॅनर्जी यांच्या नोबेल पुरस्कारामुळे अनेक अस्वस्थही झाले आहेत. जेएनयूचे विद्यार्थी म्हणजे ‘तुकडेतुकडे गँग’ अशी खिल्ली उडविली जात होती. त्यामुळे अनेकांनी आज टष्ट्वीटरव फेसबूकवरून जेएनयूच्याविरोधकांना धारेवर धरणाºया पोस्टही केल्या.

कोण आहेत प्रा. बॅनर्जीच्माता-पिता : निर्मला व विनायक बॅनर्जी. दोघेही कोलकत्यात अर्थशास्त्राचे प्राध्यापक.च्शिक्षण : बी.एस्सी. (अर्थशास्त्र), १९८१, पेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता. एम.एस्सी. (अर्थशास्त्र), १९८३, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली. पी.एच.डी.- १९८८ हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका.च्वैवाहिक जीवन : मूळच्या कोलकात्यातील असलेल्या एमआयटी (अमेरिका) मधील साहित्याच्या प्राध्यापिका अरुंधती टुली यांच्याशी पहिला विवाह व नंतर घटस्फोट त्यानंतर ज्यांना ‘पी.एचडी’साठी ‘गाईड’ म्हणून १९९९ मध्ये मागदर्शन केले, त्या आताच्या पत्नी एश्थर ड्युफ्लोशी २०१५ मध्ये विवाह.च् ग्रंथसंपदा : ‘व्होलॅटिलिटी अ‍ॅण्ड ग्रोथ’ (सन २००५),‘मेकिंग एड वर्क’ (२००५), ‘अंडरस्टँडिंग पॉव्हर्टी’ (२००६), ‘पूअर इकॉनॉमिक्स: ए रॅडिकल रिथिंकिंग आॅफ दि वे टू फाईट ग्लोबल पॉव्हर्टी’ (२०११), ‘हॅण्डबूक आॅफ फील्ड एक्सपरिमेंट््स’ खंड १ व २ (२०१७) आणि ‘ए शॉर्ट हिस्ट्री आॅफ पॉव्हर्टी मेडरमेंट््स’ (२०१९). याखेरीज अनेक नियतकालिके व संदर्भ ग्रंथांतून शोधनिबंध, लेख, विवेचन. चिकित्सा असे विपुल लेखन..

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार