जिंदाल सर्वांत स्मार्ट उमेदवार
By Admin | Updated: July 11, 2015 00:27 IST2015-07-11T00:27:30+5:302015-07-11T00:27:30+5:30
ल्युसियानाचे भारतीय वंशाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत भलेही मागे पडले असतील

जिंदाल सर्वांत स्मार्ट उमेदवार
वॉशिंग्टन : ल्युसियानाचे भारतीय वंशाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत भलेही मागे पडले असतील; परंतु या शर्यतीतील ते सर्वांत स्मार्ट (तल्लख) उमेदवार आहेत, असे एका अमेरिकी वृत्तपत्राने म्हटले आहे.
ख्रिश्चियन सायन्स मॉनिटरने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, जिंदल यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. मात्र असे असूनही त्यांची ख्रिश्चन धर्मावर गाढ श्रद्धा आहे.