जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’

By Admin | Updated: January 25, 2015 01:32 IST2015-01-25T01:32:37+5:302015-01-25T01:32:37+5:30

‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे.

Jindal gets 'Identity Crisis' | जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’

जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’

वॉशिंग्टन : ‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे. जिंदाल ओळखीच्या संकटातून (आयडेंटिटी क्रायसिस) जात आहेत, असेही ते म्हणाले. क्राउले हे भारतीय- अमेरिकी समुदायात अत्यंत लोकप्रिय संसद सदस्य आहेत.
आपणास भारतीय-अमेरिकी म्हणून नाहीतर केवळ अमेरिकी म्हणून ओळखले जावे, असे जिंदाल
यांनी म्हटले होते. त्याबाबत छेडले असता काँग्रेस सदस्य क्राउले म्हणाले की, जिंदाल ओळखीच्या संकटातून जात आहेत, असे वाटते. हे त्यांच्यासाठी खूप दु:खद आहे. या आठवड्यात लंडनमध्ये दिलेल्या भाषणात जिंदाल यांनी म्हटले होते की, माझे आई-वडील अमेरिकी स्वप्नाच्या शोधात आले होते व आणि ते साकारही केले. त्यांच्यासाठी अमेरिका ही केवळ स्थान नव्हते तर एक विचार होता. माझ्या माता-पित्याने मला व माझ्या भावाला आपण केवळ अमेरिकी नागरिक बनण्यासाठी येथे आलो आहोत ना की भारतीय अमेरिकी.
क्राउले अमेरिकी संसदेतील भारतावरील संसद सदस्यांच्या गटाचे संस्थापक सदस्य असून, त्यांनी या गटाचे सहअध्यक्षपदही भूषविले
आहे. या गटाच्या सहअध्यक्षपदी आता भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य
अ‍ॅमी बेरा भूषवीत आहेत. बेरा कॅलिफोर्निया येथून दोन वेळा निवडून आले असून ते सध्या एकमेव
भारतीय अमेरिकी संसद सदस्य
आहेत.
क्राउले यांनी जिंदाल यांच्या या वक्तव्याचा निषेध करताना अ‍ॅमी बेरा यांना आपल्या ओळखीबाबत ही
चिंता नसल्याचे म्हटले आहे. बेरा यांनीही जिंदाल यांच्या या
विचाराशी अहसमती दर्शविली. भारतीय अमेरिकी म्हणून ओळखल्या जाण्याविषयी मला कोणतीही
समस्या नाही. मी नेहमीच माझ्या आई-वडिलांविषयी बोलत असतो.
मला माझ्या आई-वडिलांविषयीही गर्व आहे. त्यानंतर अमेरिकेने जे
काही दिले त्याबद्दल गर्व आहे.
मला माझ्या कहाणीची कधीही
लाज वाटली नाही.
(वृत्तसंस्था)

मी न्यूयॉर्कचा आहे. मला माझ्या आयरिश मूळाचा खूप अभिमान आहे. मी आयरिश अमेरिकन किंवा अमेरिकन आयरिश असेन. मात्र, सर्वांत आधी मी अमेरिकी आहे. जिंदाल जे मानतात ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपण अमेरिकी आहोत हे वास्तव ते सांगू इच्छितात. माझे पूर्वज कुठून आले याबाबत मला कोणताही अपराधीपणा वाटत नाही. उलट ते उघड करावे, असे मला वाटेल. मी याची प्रशंसा करीन. - जोए क्राउले

Web Title: Jindal gets 'Identity Crisis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.