जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:34+5:302016-08-26T06:54:34+5:30

जीम योंग कीम हे जागतिक बँकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत.

Jim Yong presides again? | जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?

जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?


वॉशिंग्टन : जीम योंग कीम हे जागतिक बँकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेने त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कीम यांनी जागतिक बँकेचे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नेतृत्व केले, अशी प्रशस्ती अमेरिकेने आपल्या प्रस्तावासोबत जोडली आहे.
अमेरिकेचे वित्तमंत्री जेकब जे. ल्यू यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने जीम योंग कीम यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा नामनिर्देशित केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Jim Yong presides again?