‘तो जिहादी जॉन सिद्धार्थ नाहीच’

By Admin | Updated: January 21, 2016 03:20 IST2016-01-21T03:20:06+5:302016-01-21T03:20:06+5:30

नवा जिहादी जॉन म्हणून ज्याच्याबद्दल बोलले जात आहे त्या सिद्धार्थबाबत नवे दावे केले जात आहेत. व्हिडिओत दाखविलेला जिहादी जॉन आपला भाऊ नाहीच

'Jihadi John Siddharth is not' | ‘तो जिहादी जॉन सिद्धार्थ नाहीच’

‘तो जिहादी जॉन सिद्धार्थ नाहीच’

लंडन : नवा जिहादी जॉन म्हणून ज्याच्याबद्दल बोलले जात आहे त्या सिद्धार्थबाबत नवे दावे केले जात आहेत. व्हिडिओत दाखविलेला जिहादी जॉन आपला भाऊ नाहीच, असा दावा भारतीय वंशाच्या सिद्धार्थच्या बहिणीने केला आहे.
इसिसच्या एका व्हिडिओत दाखविलेली व्यक्ती सिद्धार्थ धर असण्याच्या शक्यतेवरून सिद्धार्थची बहीण कनिका या हाऊस आॅफ कॉमन्सच्या गृह विभागाच्या एका समितीसमोर सुनावणीसाठीहजर झाल्या होत्या.
लंडनस्थित कायद्याच्या विद्यार्थी असलेल्या कनिका यांनी सांगितले की, मी माझ्या मतावर ठाम असून, ती व्यक्ती माझा भाऊ नाहीच. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Jihadi John Siddharth is not'