‘जिहादी जॉन’ ब्रिटिश आयटी पदवीधारक
By Admin | Updated: February 26, 2015 23:49 IST2015-02-26T23:49:56+5:302015-02-26T23:49:56+5:30
इस्लामिक स्टेटच्या थरकाप उडविणाऱ्या शिरच्छेदांच्या व्हिडिओत दिसणारा आणि जिहादी जॉन म्हणून ओळखला जाणारा धष्टपुष्ट जल्लाद हा कुवैत वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे.

‘जिहादी जॉन’ ब्रिटिश आयटी पदवीधारक
लंडन : इस्लामिक स्टेटच्या थरकाप उडविणा-या शिरच्छेदांच्या व्हिडिओत दिसणारा आणि जिहादी जॉन म्हणून ओळखला जाणारा धष्टपुष्ट जल्लाद हा कुवैत वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात ही खळबळजनक माहिती दिली आहे.
मोहंमद इमवाझी असे या २५ वर्षीय क्रूरकर्म्याचे नाव असून पाश्चात्त्य ओलिसांच्या हत्येच्या अनेक व्हिडिओत तो दिसतो. यापैकी काही ओलिसांना त्याने स्वत: ठार केले आहे. इमवाझीकडे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची पदवी आहे. ब्रिटनच्या सुरक्षा सेवेला त्याच्याबद्दल माहिती होती; मात्र कारवाईच्या कारणांमुळे त्याची ओळख यापूर्वी उघड करण्यात आली नव्हती.
गेल्या वर्षी हेनिंग याची हत्या करण्यात आल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या क्रूरकर्म्याची शोधमोहीम तीव्र केली. इमवाझी हा ब्रिटिश नागरिक आहे. तो एका सधन कुटुंबाचा सदस्य असून लंडनमध्ये लहानाचा मोठा झाला आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.