जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला
By Admin | Updated: April 21, 2016 16:35 IST2016-04-21T13:18:28+5:302016-04-21T16:35:25+5:30
पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे.

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २१ - पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे. पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. ही बातमी समजल्यानंतर आपल्याला अत्यानंद झाला. या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत असे जेनिफरने सांगितले.
अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील राचेल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जाडेपणा काम मिळण्यामध्ये आडवा येत असल्याचे एजंटने सांगितले. त्यानंतर मी स्वत:वर मेहनत घेतली. जेव्हा मी तंदुरुस्त असते तेव्हा मला आनंदी वाटते असे जेनिफरने पीपल्स मॅगझिनशी बोलताना सांगितले.
आत्मविश्वास, समाधान, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, चांगलेपणाने आयुष्य जगणे ही आपल्यासाठी सौदर्याची व्याख्या असल्याचे जेनिफरने सांगितले. आव्हाने स्वीकारा आणि एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर, खेद वाटून घेऊ नका असे जेनिफरने सांगितले.