अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन यांच्यादरम्यान अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. इनटच मॅगझिनने द ट्रुथ अबाऊट जेन अँड बराक नावाने एक आर्टिकल प्रसिद्ध केलं केलं होतं. तेव्हापासून या अफवांना मागच्या वर्षी सुरुवात झाली होती. या अफवांदरम्यान, बकाक आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यादरम्यान, तणावाच्या चर्चांनाही सध्या उधाण आलं आहे.
त्यानंतर लोकांनी बराक ओबामा आणि मिशेल यांच्यातील तणावाचं कारणं हे ओबामा आणि जेनिफर यांच्यामधील नातं असल्याचा दावा लोक करत होते. मात्र याबाबत बराक ओबामा आणि जेनिफर यांच्यापैकी कुणीही कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. यादरम्यान, जेनिफर हिची एक जुनी मुलाखत जिमी किमेल लाइव्हमधून व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एनिस्टन ही गमतीदार भाषेत तिच्यात आणि बराक ओबामा यांच्यामध्ये असलेल्या कथित नात्याबाबत भाष्य करताना दिसते. ती म्हणाली की, जेव्हा कधी पब्लिसिस्ट फोन येतो, तेव्हा आता काय अफवा असेल? असा प्रश्न मला पडतो.
ती पुढे म्हणाली की, अशा बातम्या मी पुन्हा पुन्हा ऐकते, मात्र मला त्याचा राग येत नाही. मी मिशेल ओबामा यांना बराक ओबामा यांच्यापेक्षा अधिक ओळखते. त्याशिवाय सोशल मीडियावर काही फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये जेनिफर बराक ओबामांची पत्नी मिशेल यांच्यासोबत एकत्रितपणे पोझ देताना दिसत आहे. या व्हायरल फोटोवर युझर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हे बॉलिवूडच्या एका इव्हेंटमधील फोटो आहेत. तसेच फोटोमध्ये दोघेही एकत्रित कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत.
जेनिफर हिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झाल्यास जेनिफर हिने अभिनेता ब्रॅड पिट याच्यासोबत २००० मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०११ मध्ये जेनिफर हिने जस्टिन थोरॉक्स हिला डेट करायला सुरुवात केली होती. तसेच २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला होता. मात्र २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. तर बराक ओबामा यांनी १९९२ मध्ये मिशेल ओबामा यांच्याशी विवाह केला होता. तेव्हापासून ते नात्यात आहेत.