शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Javed Akhatar : 26/11चे सूत्रधार आजही तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 14:15 IST

गीतकार जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये फैज महोत्सवात हजेरी लावली, यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला.

Javed Akhtar News : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhatar) स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी सार्वजनिक मंचावरुन आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले आहे. आता त्यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानालाच सुनावून आले आहेत. लाहोर येथे आयोजित फैज महोत्सवात जावेद यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानवर निशाणा साधला. 'तुमच्या देशात अजूनही दहशतवादी फिरत आहेत,' असे जावेद अख्तर म्हणाले. जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

जावेद अख्तर यांचा पाकिस्तानला टोला फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये जावेद अख्तर म्हणाले - 'आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही,' असे जावेद अख्तर म्हणाले.

रसिकांनी केले कौतुक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात दिलेल्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत. त्यांच्या विधानाचे लोकांनी कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले - आम्हाला पूर्ण मुलाखत पाहायला मिळाली तर छान होईल. दुसर्‍याने लिहिले - खूप छान. तिसऱ्या एकाने लिहिले - याला देशभक्ती म्हणतात. यावेळी एका युजरने त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. एकाने हिलिले – म्हणूनच जावेद साहेबांसाठी माझ्या मनात प्रेम आहे. काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये टाळ्या वाजवणारे इमोजी पाठवले आहेत. तर कोणी म्हटलं की जावेद अख्तरबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर आणखी वाढला आहे.

अली जफरसोबत जावेद यांचे सत्रपाकिस्तानी गायक अली जफरसोबत जावेद अख्तरचे युगल गाणे सोशल मीडियावर पसंत केले जात आहे. या जॅम सेशनच्या व्हिडिओमध्ये अली जफर किशोर कुमारचे जिंदगी आ रहा हूँ मैं गाणे गात आहे. व्हिडिओमध्ये जावेद अख्तर आणि अली जफर लोकांमध्ये बसलेले आहेत. वातावरण संगीताने भरलेले आहे. जावेद आणि अलीच्या या जॅम सेशनने लोकांना खूश केले आहे. लाहोरमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय फैज महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जावेद अख्तर यांनी महोत्सवात मुशायरात सहभाग घेतला आणि त्याचे नवीन पुस्तकही लाँच केले.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPakistanपाकिस्तान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद