शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे कोसळले, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 12:44 IST

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळत असताना तोल जाऊन खाली कोसळतात, मात्र काही वेळातच स्वत:ला सांभाळत उभे राहताना दिसत आहेत.

ठळक मुद्देजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळत असताना तोल जाऊन खाली कोसळताना दिसत आहेशिंजो आबे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत असताना ही घटना घडली

नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळत असताना तोल जाऊन खाली कोसळतात, मात्र काही वेळातच स्वत:ला सांभाळत उभे राहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिंजो आबे यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील तिथे उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच आशिया खंडाच्या दौ-यावर होते. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत असताना ही घटना घडली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, सफेद रंगाची जर्सी घातलेले शिंजो आबे तोल गेल्यामुळे खाली मैदानातच कोसळतात. उतार असल्या कारणाने शिंजो आबे घरंगळत खाली येताना दिसत आहे. पण काही वेळातच ते स्वत:ला सांभाळतात आणि उठून उभे राहतात. 

पण जेव्हा शिंजो आबे कोसळले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प आपल्या सहका-यांसोबत पुढे निघून जात असल्याने शिंजो आबे खाली पडल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांना कळण्याआधीच शिंजो आबे उठून उभे राहिले होते. पण व्हिडीओ मात्र संपुर्ण जगभरात व्हायरल झाला आहे. 

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा शिंजो आबे अमेरिका दौ-यावर गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासोबत गोल्फ खेळले होते. त्यामुळे आशिया दौ-यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना असलेली गोल्फची आवड लक्षात घेता शिंजो आबे यांनी त्यांच्यासोबत गोल्फ खेळायचं ठरवलं होतं. 

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पSocial Mediaसोशल मीडिया