जपानी ओलिसाच्या आवाजातील संदेश

By Admin | Updated: January 30, 2015 00:19 IST2015-01-30T00:19:21+5:302015-01-30T00:19:21+5:30

: जपानी ओलिस केंजी गोटोच्या आवाजातील नवीन संदेश जारी करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जॉर्डनसाठी अल-काईदाशी संबंधित एका

Japanese olympic voice message | जपानी ओलिसाच्या आवाजातील संदेश

जपानी ओलिसाच्या आवाजातील संदेश

बैरुत/टोकियो : जपानी ओलिस केंजी गोटोच्या आवाजातील नवीन संदेश जारी करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जॉर्डनसाठी अल-काईदाशी संबंधित एका इराकी सदस्याची सुटका करण्यासाठीची मुदत वाढविली आहे. तथापि, जपान आणि जॉर्डनच्या ओलिसांची हत्या करण्यासंबंधीचा दहशतवाद्यांचा हा नवीन संदेश खरा असल्याबाबत जपानने साशंकता व्यक्त केली आहे.
इंग्रजीतील या संदेशात म्हटले आहे की, जॉर्डनने आज सूर्यास्तापर्यंत तुर्की सीमेवर महिला अतिरेकी साजिदा अल-रिश्वीला मुक्त करावे; अन्यथा जॉर्डन वायूदलाचा वैमानिक मस-अल कसासबेहची हत्या केली जाईल.
या वैमानिकाच्या सुटकेसाठी जॉर्डनने इस्लामिक स्टेटच्या एका सदस्याची सुटका करण्याची तयारी दाखविली होती.(वृत्तसंस्था)

 

Web Title: Japanese olympic voice message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.