शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Japan Smiling Classes: कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:06 IST

Japan Smiling Classes: सध्या जपानमध्ये स्मायलिंग क्लासची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Japan Smile Classes: हसायला पैसे लागत नाहीत, असं म्हणतात. पण जपानमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देत आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कोविड काळात जपानी लोकांनी इतके दिवस मास्क घातले होते की, ते हसणेही विसरले. पण, आता हसण्याचे क्लास लावून ते लोक हसणे शिकत आहेत. 

कोरोनाच्या काळात जपानी लोकांनी मास्क घालण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले. याआधीही त्यांनी आजारांपासून बचाव करण्यासाठी मास्क घातले आहेत. त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आहेत. टोकियो आर्ट स्कूलमधील डझनभर विद्यार्थी हातात आरसा घेऊन हसायला शिकत आहेत. हाताने गाल ओढून हसण्याचा सराव करत आहेत. स्माईल कोच किको कावानोच्या क्लासमध्ये जाण्यासाठी लोक फीदेखील भरत आहेत.

जपानी लोकांना मास्क घालण्याची इतकी सवय झालीये की, सरकारने नियम शिथिल केल्यानंतरही ते मास्क घालत आहेत. फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार बंदी उठल्यानंतरही केवळ 8 टक्के जपानी लोकांनी मास्क घालणे बंद केले आहे. मास्क घातल्यामुळे गेल्या तीन वर्षांत, बहुतेक जपानी लोकांसमोर आता मास्कशिवाय सार्वजनिक जीवनात कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेडिओ होस्टने स्माईल कंपनी सुरू केलीकिको कावानो ही रेडिओ होस्ट आहे आणि 2017 मध्ये तिने स्माईल कंपनी सुरू केली. कोविड काळात तिला अधिक लोकप्रियता मिळाली. ती लोकांना हसायला शिकवते आणि त्याचे फायदेही सांगते. ती म्हणते की लोक जिममध्ये जाऊन शरीराचे स्नायू मजबूत करतात, पण चेहरा विसरतात. मास्क घालण्याचा नियम शिथिल झाल्यानंतरच तिचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. किको कावानो एका तासाच्या सत्रासाठी सुमारे $55 (सुमारे 4500 रुपये) आकारते. ती पूर्ण-दिवसीय कार्यशाळा देखील घेते, ज्यासाठी ती 80,000 जपानी येन (सुमारे 47,000 रुपये) आकारते.

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या