शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नाहीच, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 10:43 IST

एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे.

ठळक मुद्देकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूचपुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.'' असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले

इस्लामाबाद - एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असू शकत नाही, अशी ओरड  सुरू केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे अशी विचारणा झाली असता जैश ए मोहम्मदने हे कृत्य केलेले नाही, असा दावा केला.  "पुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.'' असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले. मात्र जैशशी कुणी संपर्क साधला होता, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.  यावेळी युद्ध हा पर्याय नसल्याचा दावाही त्यांनी केला. ''आजच्या घडीला युद्ध हा कुठल्याही समस्येवर तोडगा ठरू शकत नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागल्याने समस्या सुटणार नाही. मात्र युद्ध करणे हे आत्मघाती पाऊल ठरू शकते.'' असा दावा कुरैशी यांनी केला. दरम्यान,  पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेच्या बाता मारत असताना दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला. आहे.  पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे  मागत आहे. तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी काल केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदmasood azharमसूद अजहर