ब्राझीलमध्ये कारागृहात हाणामारी, 33 कैद्यांचा मृत्यू

By Admin | Updated: January 6, 2017 20:20 IST2017-01-06T20:12:16+5:302017-01-06T20:20:28+5:30

ब्राझीलमधील अॅमेझॉन परिसरात असलेल्या कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत 33 कैद्यांचा मृत्यू झाला असल्याची, माहिती येथील अधिका-यांनी शुक्रवारी दिली.

Jailed in Brazil, 33 prisoners die | ब्राझीलमध्ये कारागृहात हाणामारी, 33 कैद्यांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये कारागृहात हाणामारी, 33 कैद्यांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 06 - ब्राझीलमधील अॅमेझॉन परिसरात असलेल्या कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत 33 कैद्यांचा मृत्यू झाला असल्याची, माहिती येथील अधिका-यांनी शुक्रवारी दिली. 
याचबरोबर पाच दिवसांपूर्वी अशाच प्रकार येथीस मनाउस कारागृहात घडला होता. यावेळी 56 कैद्यांची हत्या करण्यात आली होती.  ही घटना सुद्धा कैद्यांच्या दोन गटांतील संघर्षामुळे घडली होती. 
दरम्यान, ब्राझीलच्या कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे येथील कारागृहांमध्ये अशाप्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. 

Web Title: Jailed in Brazil, 33 prisoners die