शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा

By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2025 06:28 IST

कारमधील सेफ्टी फीचर्स जास्त महत्त्वाचे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई 

जेरुसलेम : बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने आपली या क्षेत्रातील इस्रायलच्या उद्योगपतींशी चर्चा झाली आहे. भारताची या क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे आपल्याकडे हे तंत्रज्ञान आले तर त्याच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणावर कमी होतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

भारत-इस्रायल व्यापारी शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवारी मंत्री गोयल यांनी जेरुसलेम येथे ‘ड्रायव्हरलेस’ कारचा अनुभव घेतला. भारतात अशा बिना ड्रायव्हरच्या कारची सध्या गरज नसली, तरी यातील सेफ्टी फीचर्स अतिशय उपयोगी ठरू शकतील, असे गोयल म्हणाले.  भारतात अशा कारला जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात उत्पादन झाले तर या तंत्रज्ञानाची किंमत ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे मत इस्रायली कंपन्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

अशी आहे ‘ड्रायव्हरलेस’ कार, तुम्ही नुसते बसायचेसमोरच्या मोठ्या स्क्रीनवर कुठे ट्रॅफिक लाइट्स आहेत, ज्या ठिकाणी जायचे आहे त्या रस्त्याचा नकाशा, तेथील वाहतूक अशा सगळ्या गोष्टी दिसतात. कुठे थांबायचे, कुठे किती स्पीड घ्यायची, याचे निर्णय कारमधील यंत्रणा घेते. कारमध्ये ११ कॅमेरे आहेत. समोरच्या बाजूचे दोन कॅमेरे १२० डिग्री अँगलने आजूबाजूची माहिती देतात. एक कॅमेरा २८० डिग्रीमधून ४५० ते ६०० मीटर दूरचे झूम कॅमेऱ्यासारखे दृश्य दाखवतो.  गाडीला ५ रडार आहेत. त्यातून आजूबाजूच्या सगळ्या हालचाली स्पष्टपणे समोरच्या स्क्रीनवर दिसू शकतात.

हायड्रोपोनिक शेतीची पाहणी अन् भारतीय भेटीलादौऱ्याच्या शेवटच्या दिवशी इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इस्रायलचे वाणिज्य मंत्री वीर बरकत विशेष पाहुणे होते. पेन ड्राईव्हचा शोध कसा लागला याची गोष्ट इथे सांगण्यात आली. ‘किबुत्झ’ शेतात त्यांनी हायड्रोपोनिक शेती पाहिली.  अतिशय कमी पाण्यात, कमी खतांमध्ये जवळपास सेंद्रिय उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे घेतले जाते ते बघण्यासारखे होते. 

मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी क्षेत्रातील कंपनी मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रासोबत भारताला मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. त्याशिवाय बंगळुरूमध्ये ‘चेकपॉईंट’साठी जास्त जागा निर्माण होतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Driverless car tech, not the car itself, crucial for India.

Web Summary : Piyush Goyal discussed driverless car technology with Israeli industrialists, emphasizing its importance for India. This tech could significantly reduce costs with local production. He experienced the car's safety features and hydroponic farming techniques, beneficial for India.
टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल