बस झाले, चीनचा अमेरिकेला इशारा
By Admin | Updated: October 30, 2015 21:55 IST2015-10-30T21:55:16+5:302015-10-30T21:55:16+5:30
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकेच्या प्रवेशावरून आपण प्रचंड चिंतेत आहोत. अमेरिकेने यापुढेही हाच कित्ता गिरवला तर सुरक्षेसाठी आपण आवश्यक ती सर्व पावले उचलू शकतो, असा इशारा चीनने दिला आहे.

बस झाले, चीनचा अमेरिकेला इशारा
बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकेच्या प्रवेशावरून आपण प्रचंड चिंतेत आहोत. अमेरिकेने यापुढेही हाच कित्ता गिरवला तर सुरक्षेसाठी आपण आवश्यक ती सर्व पावले उचलू शकतो, असा इशारा चीनने दिला आहे.
अमेरिकन युद्धनौकेने वादग्रस्त सागरी भागात गस्त घालण्यास दोन दिवस उलटल्यानंतर चीनचे नौदलप्रमुख अॅडमिरल वू शेंगली यांनी त्यांचे अमेरिकन समपदस्थ अॅडमिरल जॉन रिचर्डसन यांच्या सोबतच्या चर्चेत हा इशारा दिला. (वृत्तसंस्था)