शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, पतीने चाकूने वार करत घेतला तिचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 11:52 IST

Husband Killed Wife in Italy : पत्नीवर चाकूने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून वीटो बेडरूममध्ये गेला आणि झोपला. सकाळी उठल्यावर त्याने कथितपणे नाश्ता केला.

इटलीमध्ये (Italy) एका ८० वर्षीय व्यक्तीने आपल्या ६१ वर्षीय पत्नीची चाकूने वार करून हत्या (Husband Killed Wife) केली. व्यक्तीने शारीरिक संबंध (Sexual Relation) ठेवण्याआधी वायग्रा (Viagra) घेतली होती. पण पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिला. यावरून नाराज झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीवर हत्येचा आरोप लावला आहे त्याचं नाव वीटो कांगिनी आहे. ख्रिसमसवर त्याची पत्नी नतालिया क्यारीचोकने त्याच्यासोबत संबंध ठेवण्याचं प्रॉमीस केलं होतं. पण वीटोने वायग्रा घेतल्यानंतर  पत्नीने अचानक संबंध ठेवण्यास नकार दिला. 

संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून हत्या

याच गोष्टीवरून वीटो आणि नतालियामध्ये भांडण सुरू झालं होतं. आपल्या पत्नीपेक्षा साधारण २० वर्षाने मोठा असलेल्या वीटोने तिच्यावर तिच्या बॉसच्या जवळ जाण्याचा आरोप लावला. नंतर भांडण इतकं वाढलं की, वीटोने चाकूने वार करत नतालियाची हत्या केली.

हत्येनंतर बेडवर जाऊन झोपला

रिपोर्टनुसार, पत्नीवर चाकूने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून वीटो बेडरूममध्ये गेला आणि झोपला. सकाळी उठल्यावर त्याने कथितपणे नाश्ता केला, आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला आणि घरी येऊन आपलं काम करू लागला. जसं काहीच झालं नाही असं तो वागला.

दुपारी त्याने नतालियाने ज्या रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम केलं होतं तिथे फोन केला. त्याने तिच्या बॉसला सांगितलं की, तो आता नतालियाला पुन्हा कधीही बघू शकणार नाही. वीटो नतालियाच्या बॉसला म्हणाला की, 'मला माहीत आहे तुम्हा  दोघांमध्ये काहीतरी सुरू होतं'.

यानंतर  रेस्टॉरंटच्या मालकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी वीटोच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना वीटोच्या घरात नतालियाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. पोलिसांनी वीटोला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :ItalyइटलीCrime Newsगुन्हेगारी