शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

चारित्र्यहननविरुद्ध इटलीच्या पंतप्रधान कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:02 IST

पंतप्रधान मेलोनी यांनी जी अब्रूनुकसानीची रक्कम मागितली आहे, ती प्रतीकात्मक आहे.

तंत्रज्ञान हे शाप की वरदान, हा प्रश्न आजकाल अनेकदा, अनेक ठिकाणी उपस्थित होतो. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुलभ, वेगवान झालं आहे, हे तर खरंच. ज्या गोष्टी आजवर आपल्याला कल्पनेतही शक्य नव्हत्या, त्या अनेक गोष्टी आपण अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात वापरतोय. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात तर अक्षरश: क्रांती झाली. कोरोनाकाळातलंच उदाहरण घ्यायचं तर शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं ज्या तऱ्हेनं अनेक गोष्टी पोहोचल्या, सुलभ झाल्या त्याची आपण पूर्वी कल्पनाही करू शकलो नसतो. या काळात लक्षावधी विद्यार्थी केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीनंच शिक्षणक्षेत्रात राहू शकले. तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं आपण वापरू त्यानुसार ते शाप की उ:शाप हे ठरतं. डीपफेक हे असंच एक तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक गोष्टी सहज, सोप्या झाल्या. पण, ज्यांनी त्याचा उपयोग अप्रामाणिकपणे, दुसऱ्यांना बदनाम करण्यासाठी केला, त्यामुळे त्या व्यक्तींचं आयुष्य कसं बरबाद झालं याच्या अनेक कहाण्या आपण रोज ऐकतो आणि पाहतोही.

अगदी ताजं उदाहरण म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही प्रतिमा या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं खराब करण्यात आली. डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचा एक बनावट अश्लील व्हिडीओ तयार करून अमेरिकेतील एका ॲडल्ट कन्टेन्ट वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला. लक्षावधी लोकांनी तो पाहिला. या बनावट व्हिडीओमुळे त्यांच्या चारित्र्याचं हनन झालं. ज्यांनी हा व्हिडीओ तयार केला होता, त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले आणि त्यांना अटकही करण्यात आली. एका ४० वर्षांच्या इसमानं आपल्या ७३ वर्षांच्या पित्याच्या मदतीनं हा बनावट व्हिडीओ तयार केला होता. या दोघांवर आता खुद्द पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीच एक लाख युरोचा (साधारण एक कोटी रुपये) अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. हा दावा आपण जिंकूच याची त्यांना खात्री आहे; कारण, सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. या दाव्यातून मिळालेली रक्कम अशा प्रकारच्या बदनामीचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या महिलांना त्या देणार आहेत. 

पण, हे डीपफेक तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय?  या तंत्रज्ञानाच्या नावातूनच त्याच्या बनावटगिरीची कल्पना येते. डीपफेक व्हिडीओ हा एक प्रकारचा बनावट, काही गोष्टी एकत्र करून तयार केलेला व्हिडीओ असतो. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा लावून एखादी कृती ती व्यक्तीच करीत आहे, असा आभास त्यातून निर्माण केला जातो. या माध्यमातून चेहरा, आवाज, हावभाव यासारख्या अनेक गोष्टी बदलता येतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे टूल्स वापरून इतक्या सफाईनं त्यात एडिटिंग केलं जातं की खरा व्हिडीओ कोणता आणि खोटा व्हिडीओ कोणता याची पुसटशी शंकाही कोणाला येत नाही.

अगदी त्यातल्या तज्ज्ञांनाही सहजपणे ते समजून येत नाही. पूर्वी फक्त फोटोवरच अशा पद्धतीनं मॉर्फिंग केलं जायचं; पण, आता व्हिडीओंमध्येही चक्क माणूसच ‘बदलला’ जातो. असा प्रकार मुख्यत: अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी पोर्नोग्राफीमध्ये केला जातो. कोणाचाही साधा फोटो किंवा व्हिडीओ या तंत्रज्ञानाच्या मदतीनं न्यूड फोटो किंवा व्हिडीओत बदलता येऊ शकतो. त्याचाच फायदा घेऊन आजपर्यंत अनेक भामट्यांनी अनेक महिलांना बदनाम केलं आहे, त्यांच्याकडून मोठी खंडणी उकळली आहे, त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे उडवले आहेत आणि त्यांना अक्षरश: आयुष्यातूनच उठवलं आहे. 

पंतप्रधान मेलोनी यांनी जी अब्रूनुकसानीची रक्कम मागितली आहे, ती प्रतीकात्मक आहे. अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना हिंमत देण्यासाठी, त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवावा, यासाठी मेलोनी यांनी हा दावा दाखल केला आहे. अशा महिलांच्या मदतीसाठी एक विशेष निधीही तयार करण्यात आला आहे. त्या निधीत ही रक्कम टाकण्यात येईल. २०२२मध्ये मेलोनी यांचा बनावट व्हिडीओ अश्लील वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. लाखो लोकांना त्यामुळे धक्का बसला होता. इटलीच्या कायद्यानुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यात अपराध्याला कठोर शिक्षेची तरतूद आहे. 

टॅग्स :ItalyइटलीWorld Trendingजगातील घडामोडी