ओबामांसाठी ‘अत्यंत सन्माना’ची बाब
By Admin | Updated: January 25, 2015 02:11 IST2015-01-25T02:11:36+5:302015-01-25T02:11:36+5:30
भारताचा राष्ट्रीय दिवस समारंभाचा ‘याची देही याची डोळा अनुभव घेणे’ ही ‘अत्यंत सन्माना’ची बाब आहे. या दौऱ्याबाबत राष्ट्राध्यक्ष ओबामा खूप आतूर आहेत,

ओबामांसाठी ‘अत्यंत सन्माना’ची बाब
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे आणि भारताचा राष्ट्रीय दिवस समारंभाचा ‘याची देही याची डोळा अनुभव घेणे’ ही ‘अत्यंत सन्माना’ची बाब आहे. या दौऱ्याबाबत राष्ट्राध्यक्ष ओबामा खूप आतूर आहेत, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. व्हाइट हाउसतर्फे पत्रकारांना सांगण्यात आले की, प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल राष्ट्राध्यक्षांसाठी खूप सन्मानाची बाब आहे. भारत दौऱ्यादरम्यान प्रजासत्ताक दिन समारंभाशी संबंधित विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बराक ओबामा यांनी अद्याप कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय दिवस समारंभाला उपस्थिती लावलेली नाही. व्हाइट हाउसचे जनसंपर्क
अधिकारी जोश अर्नेस्ट म्हणाले, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष
भारतात राजकीय नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकांबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेबाबत खूप आशावादी आहेत. दोन देशांसोबतच दोन्ही नेत्यांतही परस्पर मजबूत व चांगले संबंध बनविण्यासाठीची संधी म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष या दौऱ्याकडे पाहत आहेत. या दौऱ्यात अनेक अमेरिकी उद्योजकही सहभागी होत आहेत.