खंडणीतून इसिसची दररोज 10 लाख डॉलरची कमाई
By Admin | Updated: May 21, 2015 08:53 IST2015-05-21T08:50:57+5:302015-05-21T08:53:41+5:30
इसिस वा इस्लामिक स्टेट्स खंडणी व जबरदस्तीने लावलेल्या करांच्या माध्यमातून दररोज 10 लाख डॉलर वा त्यापेक्षा जास्त रक्कम कमवत आहे.

खंडणीतून इसिसची दररोज 10 लाख डॉलरची कमाई
>न्यूयॉर्क : इसिस वा इस्लामिक स्टेट्स खंडणी व जबरदस्तीने लावलेल्या करांच्या माध्यमातून दररोज 10 लाख डॉलर वा त्यापेक्षा जास्त रक्कम कमवत असून, त्यामुळे तेलाच्या किमती उतरल्या तरीही आपला राजेशाही खर्च सहजपणो भागवणो या जिहादी संघटनेला शक्य होत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने विनानफा तत्त्वावर चालणा:या रँड कॉर्पोरेशनच्या विश्लेषणावर आधारित एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार या संघटनेतर्फे शस्त्रस्त्रे लुटली जातात. जमिनी व पायाभूत सुविधा कब्जात घेतल्या जातात, तसेच संघटनेतील सदस्यांना कमी पगार देऊन राबविले जाते.
विश्लेषणानुसार 2014 साली इस्लामिक स्टेट्सने 1.2 अब्ज डॉलर कमवले. यापैकी 600 कोटी डॉलर खंडणी व करातून मिळाले, 500 कोटी इराक सरकारच्या बँका लुटून मिळाले व 100 कोटी डॉलर तेलविक्रीतून मिळाले. इसिस आपल्या कार्यपद्धतीत बदल करून तसेच आपल्या ताब्यातील क्षेत्र वाढवून तसेच दहशतवादी कारवाया वाढवून स्वत:ला सुरक्षित ठेवत आहे. अमेरिकेच्या आघाडीतर्फे होणारे हवाई हल्ले व तेलाच्या घसरत्या किमती यामुळे इसिसच्या अर्थकारणाला धक्का बसेल, असे मानले जात होते; पण इस्लामिक स्टेट्सकडे इतका महसूल व उत्पन्न आहे की संघटनेचा खर्च सहज भागविला जातो.