इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार
By Admin | Updated: June 7, 2016 15:14 IST2016-06-07T14:48:55+5:302016-06-07T15:14:32+5:30
तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ जण ठार झाले आहेत.

इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार
ऑनलाइन लोकमत
इस्तंबुल, दि. ७ - तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ जण ठार झाले आहेत. पोलिसांच्या बसला लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा बॉम्बस्फोट करण्यात आला. सकाळच्यावेळेला गर्दीच्या वेळी शहरामध्ये हा बॉम्बस्फोट झाला.
कुठल्याही गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुर्दीश फुटीरतवादी आणि सरकारमधील तणाव वाढल्यामुळे टर्कीमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अकरा जणांमध्ये सात पोलिस ठार झाले असून, ३६ जण जखमी झाले आहेत.