शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 08:05 IST

ISRO Satellite Launch by Spacex : 4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटचीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल....

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल, असे सांगितले जात आहे.

4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटचीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या सॅटेलाइटचे मिशन लाइफ 14 वर्षांचे आहे. यासंदर्भात ISRO चे प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली. लॉन्चिंग दरम्यान ते म्हणाले, "GSAT 20 चे मिशन लाइफ 14 वर्षं एवढे आहे आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा सॅटेलाइटच्या मदतीसाठी तयार आहे."

आता 3000 मीटर उंचीवर वापरता येईल इंटरनेट -अद्यापपर्यंत भारतात फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता सरकारने नियम बदलले आहेत. आता विमान 3000 मीटर एवढ्या उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलवर इंटरनेट चालवता येईल. याच बरोबर, प्रवाशांना वाय-फायच्या माध्यमाने इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल, जेव्हा ज्या उंचीवर पोहोचल्यानंतरही विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराची परवानगी दिली जाते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. का घेतली गेली SpaceX ची मदद?भारताचे स्वतःचे रॉकेट मार्क-3 हे केवळ 4,000 किलो वजनाचे सॅटेलाइट अथवा उपग्रह अवकाशात घेऊन जाऊ शकते. मात्र, GSAT-N2 चे वजन 4,700 किलो एवढे आहे, जे खूप अधिक आहे. चामुळे इस्रोने स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. SpaceX चे रॉकेट मोठे आणि शक्तिशाली आहेत. यामुळे ते GSAT-N2 अवकाशात पाठवू शकले. इस्रोसाठी दुसऱ्या कंपनीचे रॉकेट वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

टॅग्स :isroइस्रोelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिकाInternetइंटरनेट