शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:18 IST

"गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही."

 इजरायल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. यातच, इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी शुक्रवारी म्हटले आहे की, या लष्करी कारवाईचा एक हेतू गाझासाठी असलेली इस्रायलची जबाबदारी संपवणे आहे. गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही. गेल्या 2007 मध्ये हमासने गाझावर कब्जा केल्यानंतर, इस्रायलने या भागात कडक नाकाबंदी लागू केली. एवढेच नाही, तर आयात-निर्यातीवरही कडक निर्बंध आहेत.

इस्रायलने म्हटले आहे की, आपल्या लष्करी कारवाईचा दीर्घकालीन उद्देश गाझासोचे सर्व संबंध तोडणे आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले, हमासचा पराभव झाल्यानंतर, इजरायल गाझा पट्टीतील आपली जबाबदारी संपवेल. या युद्धापूर्वी, गाझाला वेजेसह इतर सर्व महत्वाच्या गोष्टींचा पुरवठा इस्रायलकडून होत होता. मात्र, युद्धपासून इस्रायलने गाझाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यातच, हे युद्ध दीर्घकाळ चालेल, असे  इस्रायली सेन्याकडून सांगण्यात आले आहे.

तीन टप्प्यांत हल्ला चढवणार - गाझामध्ये घुसून कारवाई करण्याची इस्रायलच्या लष्कराची तयारी आहे. गाझा मोहिमेची माहिती देताना गॅलेंट म्हणाले, या हल्ल्याचे तीन टप्पे असतील. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात हमासच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात कमी तीव्रतेच्या कारवाईचा समावेश असेल. यात सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल. तर, तिसऱ्या टप्प्यात गाझा पट्टीतील जीवनासाठी असलेली इस्रायलची जबाबदारी संपूष्टात आणली जाईल आणि इस्रायली नागरिकांसाठी एक नवी सुरक्षा व्यवस्था तयार केली जाईल.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलSoldierसैनिकwarयुद्ध