शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:08 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येमुळे हा संघर्ष संपेल असं म्हटलं आहे.

Israel-Iran Conflict:इराण-इस्रायल संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही देशांमधील वाद गंभीर वळणांवर पोहोचला आहे. चार दिवस हवाई हल्ले करणाऱ्या इस्रायलवरइराणने ४०० बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना संपवल्यानंतरच हा संघर्ष संपेल असं विधान नेतन्याहू यांनी केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेले युद्ध आणि तणाव संपेल असं म्हटलं आहे. इस्रायलची लष्करी कारवाई ही संघर्ष सुरु ठेवण्यासाठी नाही तर तो संपवण्यासाठी आहे, असंही नेतन्याहू म्हणाले. इस्रायल-इराण संघर्षाचा चौथ्या दिवस असताना पंतप्रधान नेतन्याहू यांनी हे वक्तव्य केले आले. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत ज्यामुळे नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही देशांनी त्यांच्या नागरिकांना मोठ्या संघर्षासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याची इस्रायलची योजना नाकारल्यानंतर नेतान्याहू यांनी खोमेनी यांना संपवण्याची भाषा केली आहे. यामुळे संघर्ष वाढणार नाही पण तो संपेल, असेही नेतान्याहू म्हणाले. मात्र ट्रम्प यांना यामुळे संघर्ष आणखी वाढू शकतो अशी भीती होती म्हणून त्यांनी खोमेनी यांना संपवण्याची योजना नाकारली.

फक्त एका फोनने नेतान्याहूंवर दबाव आणता येईल

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका एक्स पोस्टमध्ये  बेंजामिन नेतन्याहूंबाबत भाष्य केलं आहे. "जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना खरोखरच मध्यस्थी करायची असेल आणि हे युद्ध थांबवण्यात रस असेल, तर त्यांची पुढील पावले महत्त्वाची असतील. इस्रायलने त्यांची लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, नाहीतर आम्ही प्रत्युत्तर देतच राहू. फक्त एका फोन कॉलने नेतान्याहूवर दबाव आणता येतो," असं अब्बास अराघची यांनी म्हटलं.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प