शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 00:02 IST

याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता.

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामध्ये एक मोठा खुलासा समोर आला आहे. अमेरिकन वृत्तसंस्था रॉयटर्सने दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गेल्या दोन दिवसांत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना ही योजना प्रत्यक्षात आणण्यापासून रोखले, असे रॉयटर्सने म्हटले आहे.

याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, "जर इराणने आमच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला केला, तर अमेरिकन सैन्य त्यावर अशा प्रकारे हल्ला करेल जो यापूर्वी कधीही पाहिला नसेल." तसेच, मध्यपूर्वेतील सध्याच्या संघर्षावर राजनैतिक तोडगा काढणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, "आपण इराण आणि इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतो आणि हा संघर्ष संपवू शकतो."

इराणच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प संतापले

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा इशारा तेव्हा दिला, जेव्हा तेहरानने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सला धमकावले होते. जर, त्यांनी इस्रायलवर इराणी हल्ला रोखण्यास मदत केली, तर इराण या प्रदेशातील सर्व देशांच्या लष्करी तळांना आणि इतर संस्थांना लक्ष्य करेल, असे इराणने म्हटले होते.

रविवारी (१५ जून) डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलला करार करून हा संघर्ष पूर्णपणे संपवण्याचे आवाहन केले. आपल्या हस्तक्षेपामुळे अनेक संघर्षग्रस्त देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचेही त्यांनी सांगितले. पण याचे श्रेय आपल्याला कधीच मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली असून, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या संघर्षावर टिकून आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे हा तणाव काही प्रमाणात कमी होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध