शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायलने इराणचे ॲप हॅक करून लष्करालाच खामेनींविरुद्ध फिरवले; मोबाईल पाठवले उठावाचे मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:34 IST

लष्करी हल्ल्यासोबत इस्त्रायलने इराणवर महाभयंकर सायबर हल्ला देखील केला.

Israel Hack Iran Prayer APP: मध्य-पूर्वेतील युद्धाने आतापर्यंतचे सर्वात भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा सल्लागार अली शमखानी हेदेखील मारले गेले आहेत. या सोबतच इस्त्रायलने इराणविरुद्ध सायबर युद्ध पुकारले असून, कोट्यवधी मुस्लिमांच्या श्रद्धेचा भाग असलेले बदेसाबा कॅलेंडर हे प्रार्थना ॲप हॅक करून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे.

सीआयएची ब्लूप्रिंट आणि अचूक हल्ला

अमेरिकन गुप्तचर संस्था गेल्या अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्यावर पाळत ठेवून होती. शनिवारी सकाळी तेहरानमधील एका सुरक्षित संकुलात इराणच्या सर्वोच्च नेत्यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. ही माहिती इस्त्रायलसोबत शेअर करण्यात आली. पहाटे ६:०० च्या सुमारास हल्ले सुरू झाले आणि सकाळी ९:४० वाजता लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी त्या संकुलाला लक्ष्य केले. या एकाच हल्ल्यात इराणचे संपूर्ण सर्वोच्च नेतृत्व उद्ध्वस्त झाले आहे.

प्रार्थना ॲप बनले युद्धाचे हत्यार

लष्करी हल्ले सुरू असतानाच इराणमधील ५० लाखांहून अधिक लोक वापरत असलेल्या बदेसाबा या इस्लामिक कॅलेंडर ॲपवर अचानक मेसेजचा पाऊस पडू लागला. हे ॲप नमाजच्या वेळा सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र हॅकर्सनी याचा वापर युद्धासाठी केला. मदत आली आहे, असा मेसेज पाठवून लष्करी जवानांना बंडाचे आवाहन करण्यात आले. तर सूडाची वेळ आली आहे असा मेसेज पाठवत इराणच्या सामान्य जनतेवर अत्याचार करणाऱ्या राजवटीविरुद्ध शस्त्रे खाली टाकण्याचे आवाहन सैनिकांना करण्यात आले. दुसरीकडे मुक्ती सैन्यात सामील व्हा असा मेसेज पाठवून लष्कराला अयातुल्ला राजवटीची साथ सोडून देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

माहितीवर निर्बंध आणि सायबर हल्ला

इराणमधील इंटरनेटवर ३६ तासांचा ब्लॅकआउट असताना, केवळ हे स्थानिक ॲप सुरु होते. याचाच फायदा घेत इस्त्रायलने इराणी सैनिकांच्या थेट मोबाईलपर्यंत आपले मेसेज पोहोचवले. याचवेळी इराणची अधिकृत वृत्तसंस्थेसह अनेक सरकारी वेबसाईटही हॅक करण्यात आल्या, जेणेकरून जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचू नये.

दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी आणि तेथील अमेरिकन लष्करी तळांच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel hacks Iran app, turns military against Khamenei: Uprising messages.

Web Summary : Israel allegedly hacked an Iranian prayer app, inciting military revolt against Khamenei after a deadly strike. The cyberattack spread uprising messages, exploiting the app's popularity amid an internet blackout. Iran retaliated with missile strikes.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई