शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:26 IST

या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती.

इस्रायलची मोसाद ही जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गाझामध्ये हमास असो, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह असो अथवा इराण असो इस्रायली गुप्तचर संस्थेचे डावपेच नेहमीच वरचढ ठरले आहेत. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह एका बंकरमध्ये लपून बसलेलेला आहे, याची माहिती त्यांना आधीपासूनच होती. 27 सप्टेंबरला इस्रायलने हवाई हल्ल्यात नसरल्लाह संपवला. यावरूनच इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद किती प्रबळ आहे याची कल्पना येऊ शकते. महत्वाचे म्हणजे, यासंघटनेने यापूर्वीही, हमास, हिजबुल्लाह आणि इराणचे अनेक प्लॅन फेल केले आहेत. यातच आता मोसाद इराणचे न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन भूर्र झाल्याचा दावा केला जात आहे.

इराणच्या माजी राष्ट्रपतींचे खळबळजनक दावे -इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत इस्रायलसंदर्भात अनेक मोठे दावे केले आहेत. महमूद अहमदीनेजाद म्हणाले, काही वर्षांपूर्वी इस्रायली गुप्तचर संस्थेचे प्रयत्न फेल करण्याच्या हेतूने इराणने एक गुप्तचर युनिट तयार केले  होते. जिचा हेड नंतर एक इस्रायली एजन्ट निघाला. एवढेच नाही तर, युनिटच्या हेड शिवाय डिव्हीजनचे आणखी 20 लोकही इस्रायली एजन्सी मोसादचे एजन्ट होतते, असेही महमूद यांनी सांगितले.

याशिवाय, परदेशी एजन्ट्सद्वारे 2018 मध्ये इराणच्या न्यूक्लिअर डॉक्युमेन्ट्सची चोरी आणि मुख्य न्यूक्लिअर सायंटिस्ट्सच्या हत्येमागेही गुप्तचर एजन्सींचा हात असल्याचा दावाही इराणच्या माजी राष्ट्रपतींनी केला आहे. तसेच, इस्रायली एजन्सीने त्यांच्या देशाच्या गुप्तचर सेवांवर हल्ला केल्याचेही इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी कबूल केले आहे. 

इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचे डॉक्युमेन्ट कसे गायब झाले? सर्वच सांगितलं -इराणचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम आजपर्यंत यशस्वी होऊ शकलेला नाही. त्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे इस्रायल. कारण इराण न्यूक्लिअर संपन्न देश होणे इस्रायलच्या दृष्टीने घातक आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 2018 मध्ये मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते, इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेन्ट इस्रायली एजंट्सने मिळवले आहेत. यानंतर, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनेही या वृत्ताला दुजोरा देत, तेहरानमधील कारवाईतून कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे म्हटले होते.

या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती.

 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध