शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"इस्रायलला किंमत चुकवावी लागेल" अली लारीजानींच्या हत्येनंतर इराणचा सूडाचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 00:24 IST

मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने इस्रायलला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे.

मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणनेइस्रायलला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल आणि इस्रायलला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी म्हटले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी माहिती दिली आहे की, इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान इस्रायली फौजांनी अली लारीजानी यांना ठार केले. लारीजानी हे इराणच्या धोरणात्मक आणि सुरक्षा वर्तुळातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जात होते. त्यांच्या मृत्युनंतर इराणमध्ये संतापाची लाट असून, मोजतबा खामेनेई यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

मोजतबा खामेनेई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लारीजानी यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, "लारीजानी हे एक दूरदर्शी, बुद्धिमान आणि समर्पित विद्वान होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीची हत्या ही इस्लामच्या शत्रूंचा त्यांच्याबद्दल असलेला द्वेष दर्शवते. गुन्हेगारांना याची किंमत मोजावी लागेल. अशा कृत्यांमुळे इस्लामिक राष्ट्राचा इरादा अधिक मजबूत होईल."

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने पुष्टी केली आहे की, अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात बसीज स्वयंसेवक दलाचे प्रमुख घोलमरेझा सोलेमानी यांचाही मृत्यू झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून इराणवर सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता थेट युद्धाच्या छायेत आहे. या हत्यांनंतर इराण आणि त्याच्या प्रादेशिक मित्रपक्षांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन आणि इस्रायली तळांवर हल्ले तीव्र केले. होर्मुझची सामुद्रधुनी आणि ऊर्जा केंद्रांवर या संघर्षाचा परिणाम होत असल्याने जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran vows revenge on Israel after top official's killing.

Web Summary : Iran threatens Israel after Ali Larijani's death, vowing retaliation. Khamenei mourns Larijani, a key figure. Attacks escalate, raising fears of wider conflict and disrupted oil supplies.
टॅग्स :Warयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका