भारतासोबत संबंध दृढ करण्यास इस्रायल इच्छुक -एकोव्ह

By Admin | Updated: January 25, 2015 01:26 IST2015-01-25T01:26:28+5:302015-01-25T01:26:28+5:30

मेक इन इंडिया या योजनेला यशस्वी बनविण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन इस्रालयचे वाणिज्य उच्चायुक्त जनरल डेव्हिड एकोव्ह यांनी येथे केले आहे.

Israel wants to strengthen relations with India -Ekov | भारतासोबत संबंध दृढ करण्यास इस्रायल इच्छुक -एकोव्ह

भारतासोबत संबंध दृढ करण्यास इस्रायल इच्छुक -एकोव्ह

वडोदरा : इस्रायलमधील कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास तसेच देशासोबत सहकार्य करून मेक इन इंडिया या योजनेला यशस्वी बनविण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन इस्रालयचे वाणिज्य उच्चायुक्त जनरल डेव्हिड एकोव्ह यांनी येथे केले आहे. एकोव्ह व त्यांचे पथक वडोदरा महानगरपालिकेसोबत दुहेरी शहर करार करण्यासाठी येथे आले आहेत.
शुक्रवारी येथे आयोजित फ्रेंडस आॅफ इस्रायल या कार्यक्रमानंतर एकोव्ह यांनी, मोदी मागील वर्षी सत्तेत आले तेव्हापासून इस्रायल व भारताच्या संबंधांमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
दोन्ही देशांनी संरक्षण व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही बाब वाढत्या आर्थिक व राजकीय सहकार्याला अधोरेखित करणारी आहे असे म्हटले.
गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत इस्रालयचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या झालेल्या भेटीनंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही इस्रायल दौरा केला व आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याही या वर्षी इस्रायलला भेट देण्याची शक्यता असल्याचे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Israel wants to strengthen relations with India -Ekov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.