शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 23:29 IST

Israel vs Iran War: इराणच्या संभाव्य हल्ल्यांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी देश सोडल्याचे वृत्त येत आहे. इराणवरील हल्ल्यांनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे.

इस्रायलच्या आकाशात खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. इस्रायलने आज दिवसभरात तिसऱ्यांदा इराणवर हल्ला चढविला आहे. पहाटे शेकडो लढाऊ विमाने इराणमध्ये घुसली होती, तिथे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ले करून ती परतली होती. यात इराणचे महत्वाचे अण्वस्त्र शास्त्रज्ञ मारले गेले आहेत. अशातच इराणने इस्रायलवर हल्ल्याची तयारी सुरु केली असून मोठे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

इराणच्या संभाव्य हल्ल्यांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी देश सोडल्याचे वृत्त येत आहे. इराणवरील हल्ल्यांनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे. नेतान्याहू यांच्या विमानाचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांना दोन लढाऊ विमानांनी एका गुप्त ठिकाणी नेले जात असल्याचे दिसून आले आहे. इस्रायलच्या चॅनल १२ ने नंतर वृत्त दिले की विमान ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये उतरले आहे. 

आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इस्रायली विमान कंपन्यांनी त्यांची विमाने एकही प्रवासी न घेता परदेशात हलविली आहेत. एलएल इस्रायल आणि अर्कियाने आपली विमाने इस्रालयबाहेर नेऊन पार्क केली आहेत. तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानांनी प्रवाशांशिवाय उड्डाण केले. पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. इस्रायल एअरलाइन्सने सांगितले की ते त्यांची विमाने विमानतळावरून काढून इतरत्र हलवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तयार केलेल्या आकस्मिक योजनेचा हा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एल अलने सांगितले की ते इस्रायलमधील त्यांच्या गंतव्यस्थानांवर विमाने हलवत आहेत, तर अर्कियाने त्यांची विमाने कुठे पाठवली जात आहेत हे सांगण्यास नकार दिला.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIranइराणwarयुद्ध