शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 20:25 IST

...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत तब्बल 33 हजार निष्पाप नागरिक मारले गेले आहेत. तर इस्रायललाही जवळपास दीड हजार लोकांना गमवावे लागले आहे. मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. "जर आपल्या भूमीवरून हल्ला झाला, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्हीही घुसून हल्ला करू," असे इस्रायलचे म्हणणे आहे.

इस्रायलने काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च जनरलसह अनेक लोक मारले गेले. या हल्ल्यानंतर इराण संतापला असून त्याने अमेरिकेलाही या प्रकरणापासून दूर राहण्यास सांगितले असून आता आम्ही इस्रायलवर हल्ला करणार. याची वेळही आम्हीच ठरवणार, असे म्हटले आहे. यावर इस्रायलने म्हटले आहे, 'जर इराणने त्यांच्या भूमीवरून हल्ला केला तर इस्रायल प्रत्युत्तर देईल आणि इराणमध्ये हल्ला होईल.' इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी बुधवारीही म्हटले आहे की, आम्ही वचन देतो की, इस्रायलवर हल्ला होणार. सीरियातील आमच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा बदला आम्ही घेणार.

इस्रायल राफावर हल्ल्यासाठी तयार -गाझातील रफाह शहरावरही इस्रायल हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासच्या दहशतवाद्यांनी येथे आपले अड्डे तयार केले आहेत आणि तेथेच ज्यू बंधकांनाही ठेवले आहे. इस्त्रायलने रफाहमधून नागरिकांना बाहेर काढण्याची योजनाही तयार केली असून त्यासाठी 40 हजार तंबूही मागवले आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIranइराणIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्ध