शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:45 IST

इस्रायलच्या एका क्षेपणास्त्राने इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर, सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले.

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता चौथ्या दिवशीही सुरूच असून, दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. या वाढत्या संघर्षामुळे दोन्ही राष्ट्रांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा इस्रायलनेइराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या एका क्षेपणास्त्राने इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर, सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. इतकंच काय तर अँकरलाही स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला.

इराणी भागांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव

मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या अनेक भागांवर इस्रायली क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत असल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.

या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक अँकर लाईव्ह बुलेटिन दरम्यान बातम्या वाचत असताना दिसत आहे. याचवेळी स्टुडिओच्या परिसरात एक क्षेपणास्त्र येऊन आदळते. या घटनेमुळे अँकर बुलेटिनच्या मध्यातच घाबरते आणि तिला जागेवरून उठून पळून जावे लागते. सुदैवाने, या घटनेत अँकर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी होते.

इस्रायलचा इशारा; नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन

इस्रायलने यापूर्वीच सांगितले होते की, ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने आधीच तेहरानमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले होते. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असल्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक सुरक्षित निवाऱ्यासाठी पळ काढत आहेत, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :IranइराणViral Videoव्हायरल व्हिडिओIsraelइस्रायलwarयुद्ध