शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 06:44 IST

Israel Major Attack on Iran: आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गेल्या काही काळापासून इस्त्राइल आणि इराणमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला होता. दरम्यान, इस्त्राइलकडून इराणवर हल्ला होण्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणमधील नातांज आणि फोर्दो अणुकेंद्रांमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. तसेच तेहरानमधील इमाम खुमैनी विमानतळावरही स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्राइलने आपला सर्वात मोठा शत्रू असलेल्या इराणवर थेट हल्ला केल्याने आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 

दरम्यान, आखाती देशांमध्ये कोणत्याही क्षणी भीषण संघर्षाला तोंड फुटू शकतं, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त करून काही तास उलटत नाहीत तोच इस्राइलने इराणवर हा हल्ला चढवला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा कोणताही हात नसून, आम्ही इस्राइलला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. 

इस्रालइकडून इराणमध्ये हल्ले करण्यात आल्यानंतर इराणकडून  होणाऱ्या प्रत्युत्तरदाखल कारवाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इस्राइलमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होऊ शकतो, असे इस्राइलचे संरक्षणमंत्री इस्राइल काट्स यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध