अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. इराणने प्रत्युत्तर दिले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्युनंतर लेबनीज उग्रवादी संघटना हिजबुल्लाह देखील या युद्धात उतरला. हिजबुल्लाहने इस्रायलमध्ये अनेक बॉम्बस्फोट केले. इस्रायलने आता बेरूतमधील दहियाह येथील हिजबुल्लाहच्या समर्थन तळावर हल्ला केला आहे, यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.
मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील विमान भाडे अनेक पटींनी वाढले; ७०० हून अधिक उड्डाणे रद्द
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मंगळवारी सकाळी बहरीनच्या शेख इसा परिसरातील अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे सांगितले.
आयआरजीसीच्या माहितीनुसार, हल्ल्यात २० ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यामुळे तळाची मुख्य कमांड आणि मुख्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली आणि इंधन टाक्यांना आग लागली. बहरीनने अद्याप हल्ल्याला प्रतिसाद दिलेला नाही.
मध्य पूर्वेतील परिस्थिती बिघडली
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणने सात देशांमधील अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला करत आहे.
Web Summary : Israel attacked Hezbollah in Beirut following its involvement in the conflict after Khamenei's death. Iran retaliated by targeting a US airbase in Bahrain, escalating Middle East tensions and disrupting air travel. Schools in Beirut are sheltering displaced people.
Web Summary : खमेनी की मृत्यु के बाद संघर्ष में हिज़्बुल्लाह की भागीदारी के बाद इज़राइल ने बेरूत में हिज़्बुल्लाह पर हमला किया। ईरान ने बहरीन में एक अमेरिकी एयरबेस को निशाना बनाकर जवाबी कार्रवाई की, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया और हवाई यात्रा बाधित हो गई। बेरूत के स्कूल विस्थापित लोगों को आश्रय दे रहे हैं।