तेहरान/तेल अवीव: शनिवारी सकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या चर्चांनी जोर धरला आहे. इस्रायलच्या 'चॅनल १२' ने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, खामेनेई या हल्ल्यात मारले गेले असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत खमेनेई सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
नेमकी काय आहे स्थिती?इस्रायलचा दावा: इस्रायली सैन्याने खामेनेई यांच्या तेहरानमधील निवासस्थानावर आणि कंपाऊंडवर सुमारे ३० पेक्षा जास्त शक्तिशाली बॉम्ब डागले. उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंमध्ये हे निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सूचक विधान करत म्हटले की, "सर्व संकेत सांगत आहेत की हा हुकूमशहा आता आपल्यात नाही."
इराणचे स्पष्टीकरण: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझ्या माहितीनुसार खामेनेई सुरक्षित आणि जिवंत आहेत. देशातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी आपापल्या जागी असून परिस्थिती नियंत्रणात आहे." इराणच्या सरकारी टीव्हीने खमेनेई लवकरच देशाला संबोधित करतील असेही संकेत दिले आहेत.
दोन बड्या नेत्यांचा मृत्यू निश्चितदरम्यान, इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
Web Summary : Following alleged Israeli strikes, conflicting reports emerge about Ayatollah Khamenei's fate. Israel claims his residence was bombed, suggesting his death. Iran denies this, stating Khamenei is alive and well. Two other Iranian leaders are confirmed dead.
Web Summary : इजरायली हमलों के बाद, अयातुल्ला खमेनी की मौत की अटकलें। इजराइल का दावा है कि उनके आवास पर बमबारी हुई, जिससे उनकी मृत्यु का संकेत मिलता है। ईरान ने इसका खंडन किया, कहा खमेनी जीवित और सुरक्षित हैं। दो अन्य ईरानी नेताओं की मौत की पुष्टि।