शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलवर इराणचा महाभयंकर हल्ला! १२ तासांपासून क्षेपणास्त्रांचा पाऊस; हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 09:24 IST

Israel-Iran War Update: इराणने इस्रायलच्या दक्षिण आणि मध्य भागात क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इलात शहरात क्लस्टर म्युनिशनमुळे नुकसान. हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरू. वाचा सविस्तर.

तेल अवीव: मध्य आशियातील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणनेइस्रायलच्या विविध शहरांवर गेल्या १२ तासांपासून क्षेपणास्त्रांचा धडाका लावला आहे. इस्रायलच्या दक्षिण, मध्य आणि उत्तर भागात सातत्याने स्फोटांचे आवाज ऐकू येत असून नागरिक बंकरचा आधार घेत आहेत. याच वेळी उत्तरेकडून लेबनॉनस्थित हिजबुल्लानेही रॉकेट हल्ले चढवून इस्रायलची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वात भीषण हल्ला दक्षिण इस्रायलमधील इलात शहरात झाला आहे. येथे इराणने डागलेले 'क्लस्टर म्युनिशन' पडल्याने त्याचे अवशेष शहराच्या विविध भागात पसरले. यामुळे किमान १० ठिकाणी मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचाही समावेश असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरांमध्ये आगीचे तांडव आणि घबराटलोड, बनेई ब्राक आणि रामला या शहरांमध्ये सुरुवातीला क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आग लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर प्रशासनाने स्पष्ट केले की, येथील आगीचा क्षेपणास्त्रांशी थेट संबंध नाही.

वृद्धांना दुखापतआगीच्या घटनांमध्ये दोन ८० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराणच्या हल्ल्यांवेळीच उत्तर सीमेवरून हिजबुल्लानेही रॉकेटचा वर्षाव केल्याने इस्रायली संरक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. इस्रायलने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण केली असून, आगामी काही तास संपूर्ण जगासाठी अत्यंत चिंतेचे ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks Israel: Missile Barrage, Hezbollah Rockets Add to Tensions

Web Summary : Iran has launched a massive missile attack on Israel, targeting various cities. Hezbollah also joined with rocket strikes. Southern Israel hit hard, with injuries reported and widespread damage. Israel prepares to retaliate, raising global concerns.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणIsraelइस्रायलWarयुद्ध