शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा! इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू; मुलीच्या घरी होते, इस्रायलला कसे समजले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:47 IST

Israel Iran War Update: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन मोठे नेते ठार झाले आहेत. कासिम सुलेमानी यांचा मुलगा आणि माजी स्पीकर लारीजानी यांच्या मृत्यूने तणाव वाढला.

तेहरान: इराणचे शक्तिशाली नेते अली लारीजानी यांच्यावरील इस्रायली हवाई हल्ल्याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. लारीजानी हे आपल्या मुलीच्या घरी होते. तेव्हा त्यांच्यावर हवाई हल्ला झाला आहे. लारीजानी यांचा मुलगाही यात ठार झाला आहे. 

हल्ल्याच्या वेळची हृदयद्रावक स्थिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी लारीजानी यांच्या मुली घराच्या दुसऱ्या भागात होत्या, ज्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. मात्र, आपल्या डोळ्यादेखत वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याने त्या मोठा धक्क्याखाली आहेत. अली लारीजानी यांचा मुलगा वडिलांसोबतच महत्त्वाच्या चर्चेत होता, त्यावेळी झालेल्या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. इस्रायलने हा हल्ला इतक्या अचूकपणे केला की, केवळ लारीजानी यांचे सुरक्षित ठिकाण उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्तीचे नुकसान टाळले गेले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इराणमध्ये संतापाची लाट

या हल्ल्यानंतर इराणच्या रस्त्यांवर निदर्शने सुरू झाली असून, इस्रायलविरुद्ध तात्काळ लष्करी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अली लारीजानी हे इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख असल्याने, त्यांच्या निधनामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाल्याची चर्चा आहे.

इस्रायलचा मोठा दावाइस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी यापूर्वीच दावा केला होता की, त्यांच्या हवाई दलाने तेहरानजवळील एका गुप्त ठिकाणाला लक्ष्य करून लारीजानी यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात 'बसीज मिलिशिया'चे कमांडर देखील मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

कोण होते अली लारीजानी?अली लारीजानी हे इराणच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. ते संसदेचे माजी स्पीकर आणि सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार होते. खामेनेई यांच्या निधनानंतर लारीजानी हे इराणचे 'डी-फॅक्टो' (प्रत्यक्ष) नेते म्हणून उदयास आले होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक होती.

इराणचा प्रतिशोधाचा इशाराया घटनेनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने कडक शब्दांत इशारा दिला आहे. "या रक्ताचा बदला घेतला जाईल आणि इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलने या ऑपरेशनवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांची लष्करी यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Top Iranian Leader Ali Larijani Killed in Alleged Israeli Strike

Web Summary : Iran confirms top leader Ali Larijani and his son's death in an Israeli airstrike. Israel claims responsibility, while Iran vows revenge. Larijani, a key figure, is a major loss for Iran. Tensions escalate amid heightened alert.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIsraelइस्रायल