शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:59 IST

Israel-Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीने युद्धाची तीव्रता वाढली आहे.

Israel-Iran War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली अन् इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्याचा रशिया आणि चीनसह अनेक देशांनी निषेध केला. दरम्यान, आता इराणचे लष्कर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'जुगारी' म्हटले असून, अमेरिकेला हल्ल्याची थेट धमकीही दिली आहे. 

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी म्हणतात की, अमेरिकेने इराण आणि इस्रायलमधील युद्धात थेट प्रवेश करुन इराणच्या "पवित्र भूमी"चे उल्लंघन केले आहे. अमेरिकेला आता अत्यंत शक्तिशाली आणि लक्ष्यित ऑपरेशन्स द्वारे जबरदस्त आणि अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षांना उद्देशून झोल्फाघारी म्हणाले, "मिस्टर ट्रम्प, जुगारी! तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण ते आम्हीच संपवू..!" अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अमेरिकेने इराणवर चालवले 'मिडनाइट हॅमर'!अमेरिकेने रविवारी (22 जून 2025) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यामुळे इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल, असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प