शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:07 IST

यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील...

अमेरिकेने इराणच्या 3 अणुकेंद्रांवर शनिवारी मध्यरात्री B-2 बॉम्बर्सच्या सहाय्याने मोठा हल्ला केला. यानंर, आपण फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील न्युक्लिअर साइट्स उद्धवस्त केचा दावा अमेरिकेने केला. मात्र, आपले फारसे नुकसान झाले नसल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर, आपण सोमवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भेटणार असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, अनेक देश इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असा दावा रशियाचे माजी राष्ट्रपती तथा रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.

'अण्वस्त्रांचे उत्पादन सुरूच राहणार - अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर, मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, शांततेचा दावा करत सत्तेवर आलेले डोनाल्ड ट्रम्प, आता अमेरिकेला मध्यपूर्वेच्या युद्धात ढकलत आहेत. एवढेच नाही तर, अमेरिकेच्या हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इराणचे फार काही नुकसान झाल्यासारखे दिसत नाही, असेही दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.   

यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील. तसेच, अनेक देश इराणला त्यांची अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असा दावाही केला आहे. मात्र, यात कोण कोणत्या देशांचा समावेश होतो, हे त्यांनी उघड केले नाही. 

इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची घेणार पुतिन यांनी भेट -अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अराघची म्हणाल, "रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत असतो. मी आज दुपारी मॉस्को येथे जात असून उद्या सकाळी रशियन राष्ट्रपतींसोबत गंभीर चर्चा करेन." त्यांनी ही माहिती इस्तांबुल येथे OIC (इस्लामिक सहकार्य संघटना) शिखर परिषदेदरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

अराघची-पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण -अराघची आणि पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. आता इराण अमेरिकेविरोध राजकीय आणि लष्करी रणनीतीत रशियाची मदत घेऊ शकतो. तत्पूर्वी, रशियाने इराणवर केलेल्या कारवाईसंदर्भात रशियाने नाराजीही व्यक्त केली होती.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन