शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:15 IST

Israel-Iran Conlfict: इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केल्याने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.  

इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता भीषण रूप धारण केलं आहे. सहा दिवस उलटल्यानंतरही दोन्ही पैकी एकही देश संघर्ष थांबवण्याबाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही आहे. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राइलविरोधात युद्दाची घोषणा केली आहे. तसेच इराणने इस्राइललची राजधानी असलेल्या तेल अवीववर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. तर इस्राइलनेही इराणची राजधानी असलेल्या तेहरानला लक्ष्य केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केल्याने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.  

इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडियावर लिहिले की, ‘’UNCONDITIONAL SURRENDER’’. यावरून ट्रम्प यांनी या संघर्षात इराणबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत संकेत मिळत आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबतही कठोर भाषेचा अवलंब करत त्यांनी इशारा दिला आहे. इराणचे तथाकथित सर्वोच्च नेते कुठे आहेत, हे आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यांना लक्ष्य करणं अगदी सोपं आहे. मात्र सध्यातरी ते अगदी सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना मारणार नाही, किमान सध्यातरी मारणार नाही. मात्र क्षेपणास्त्रांद्वारे होणाऱ्या हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य केलं जावं, तसेच अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केलं जाणं हे आम्हाला मान्य नाही. आता आमचा संयम संपत आहे. 

यादरम्यान, मागच्या तीन दिवसांमध्ये किमान अमेरिकेची ३० लढाऊ विमानं ही अमेरिकेच्या विविध तळांवरून युरोपमध्ये पाठवण्यात आली आहेत. ही सर्व विमाने सैन्यदलांमधील टँकर विमानं आहेत. ज्यांचा वापर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी होतो.  दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याले इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची इस्त्राइलने हत्या केल्यानंतरही युद्ध कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. The battle begins, म्हणजेच युद्द सुरू झाले आहे असे खामेनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIsraelइस्रायलIranइराण