शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:05 IST

Israel Iran Conflict : इराण आणि इस्त्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला असून आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे बनवणे थांबवण्याचा कडक इशारा दिला.

Israel Iran Conflict :  इराण आणि इस्त्रायल या दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे. या वाढत्या संघर्षामुळे जगभरात चिंता निर्माण होत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे बनवणे थांबवण्याचा कडक इशारा दिलाय. ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक पोस्ट करुन हा इशारा दिला. त्यांच्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी तेहरानच्या लोकांना शहर ताबडतोब रिकामे करण्याचा सल्ला दिला. यासोबतच, व्हाईट हाऊसने जाहीर केले की, 'ट्रम्प अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी G7 शिखर परिषदेतून लवकर निघत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विधानांमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतच्या त्यांच्या जुन्या धोरणाचा पुनरुच्चार केला आणि तो थांबवण्याचे समर्थन केले. त्यांच्या या भूमिकेमुळे युद्ध होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा

'इराणने करारावर स्वाक्षरी करायला हवी होती'

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, "मी त्यांना सांगितलेल्या 'करारावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. मानवी जीवितहानीबद्दल मला वाईट वाटते. मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. मी हे वारंवार सांगितले आहे. प्रत्येकाने ताबडतोब तेहरान सोडले पाहिजे."

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानामुळे फक्त इराणमध्येच नाही तर जागतिक नेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. जेव्हा इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे त्यावेळीच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. 'कोणत्याही किंमतीत इराणच्या अणु महत्त्वाकांक्षा सहन करणार नाहीत', असं ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

२०१८ मध्ये अमेरिकेने इराणसोबतच्या संयुक्त व्यापक कृती आराखड्यातून (GCPOA) माघार घेतली. या करारांतर्गत, इराण लष्करी उद्देशांसाठी अण्वस्त्रे विकसित करणार नाही असा निर्णय घेण्यात आला.

नागरी हितासाठी अणुकार्यक्रम चालवत आहोत असं इराण नेहमी सांगत आले आहे. पण, अमेरिका आणि इस्रायलला शंका आहे की इराण अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही. या संशयाच्या आधारे अमेरिकेने इराणसोबतचा संयुक्त व्यापक कृती आराखडा मोडला. यासोबतच इराणवर अनेक निर्बंधही लादण्यात आले.

इराणकडे अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे?

इराणने युरेनियम समृद्धीसाठी हजारो अद्ययावत सेंट्रीफ्यूज मशीन विकसित केल्या आहेत, त्यांचे प्लांट सुरू केले आहेत. JCPOA अंतर्गत, इराणला फक्त ३०० किलो युरेनियम ठेवण्याची परवानगी होती. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प