शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:11 IST

Israel Iran Conflict: इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याच्या संशयावरून तेथील अणुकेंद्र आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करणारा इस्राइल अण्वस्त्रसंपन्न देश असलेल्या पाकिस्तानवरही हल्ला करू शकतो, असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या इस्त्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या भूमिकेचीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याच्या संशयावरून तेथील अणुकेंद्र आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करणारा इस्राइल अण्वस्त्रसंपन्न देश असलेल्या पाकिस्तानवरही हल्ला करू शकतो, असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या देशाकडे नुसतं वाकड्या नजरेनं पाहिलं तरी आम्ही इस्राइलचे डोळे काढून देऊ, असा इशारा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इस्राइलला दिला आहे.

पाकिस्तान आमच्यासाठी इस्राइलवर अणुबॉम्ब टाकू शकतो, असा दावा इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्याने केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना डार म्हणाले की, जर कुणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकले जातील. जगाने हे पाहिलेलं आहे. त्यामुळे इस्राइलने पाकिस्तानकडे पाहण्याचीही हिंमत करू नये. जर इस्राइलने अशी आगळीक केली, तर विटेला दगडाने प्रत्युत्तर देण्याची क्षमता पाकिस्तानमध्ये आहे, असा इशारा त्यांनी दिला.

इराणी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या जनरल मोहसिन रेजाई यांनी पाकिस्तानकडे असलेल्या अणुबॉम्बवरून मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, जर इस्राइलने इराणवर अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान इस्राइलवर अणुहल्ला करेल. मात्र या दाव्याची चर्चा सुरू होताच पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं आणि पाकिस्तानचे नेते आणि अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इशाक डार यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रं ही केवळ पाकिस्तानसाठीच असल्याचेही स्पष्ट केलं होतं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलIranइराण