शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:23 IST

Israel-Iran Ceasefire Inside Story: इस्राइल आणि इराणमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना, तसेच अमेरिकेच्या तळांवर इराणने हल्ले केल्यानंतरही अचानक हा युद्धविराम कसा काय घोषित झाला, पडद्यामागे नेमकं काय घडलं? याची माहिती आता समोर येत आहे. 

गेल्या १२ दिवसांपासून आखाती देशांमध्ये इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्ष अखेर थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेला हल्ला आणि इराणणने कतारमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करून केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अचानक युद्धविरामाची घोषणा झाल्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. इस्राइल आणि इराणमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना, तसेच अमेरिकेच्या तळांवर इराणने हल्ले केल्यानंतरही अचानक हा युद्धविराम कसा काय घोषित झाला, पडद्यामागे नेमकं काय घडलं? याची माहिती आता समोर येत आहे. 

एकीकडे या युद्धामुळे सगळे आखाती देश होरपळून निघतील. इराणची साथ देण्यासाठी चीन, रशियासारखे देशही युद्धात उडी घेतील, त्यामधून तिसरं महायुद्ध सुरू होईल, असे दावे केले जात होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इराण आणि इस्राइलमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली आणि संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास सोडला.

इराणने सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद या तळावर सहा क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आल्याचा, तसेच यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचा दावा कतारने केला होता. तर किमान तीन क्षेपणास्त्रे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचली, असा दावा इराणमधील मेहर या वृत्तसंस्थेने केला होता. हा हल्ला झाल्यानंतर काही तासांमध्येच कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी इराणला फोन लावला. तसेच त्यांनी अमेरिकेकडून देण्यात आलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला इराणची मान्यता मिळवली. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीनुसार हा फोन लावण्यात आला होता. ट्रम्प यांनी स्वत:  कतारच्या आमिरांना फोन करून इस्राइल युद्धविरामास तयार आहे, आता इराणची समजूत काढण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले होते. त्यानंतर पुढील घडामोडी घडल्या.

तर व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा करून युद्धविरामाची निश्चिती केली. त्यासाठी जर इराणने पुन्हा हल्ला केला नाही तर इस्राइलही हल्ला करणार नाही, अशी अट निश्चित करण्यात आली. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममधील काही अधिकारी इराणी अधिकाऱ्यांच्याही संपर्कात होते. त्यामध्ये अमेरिकेचे उपाराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूर स्टीव्ह विटकॉफ यांचा समावेश होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावर युद्धविरामाबाबत माहिती देताना लिहिले की, जेव्हा सर्व पक्ष आपापल्या मोहिमा पूर्ण करतील, तेव्हा युद्धविरामास सुरुवात होईल. तसेच पुढच्या १२ तासांनंतर दोन्ही देश शांत राहतील. २४ तासांनंतर हे युद्ध संपले असं समजण्यात येईल. विश्लेषकांच्या मते हा एक ऑपरेशनल ब्रेक होता. म्हणजेच दोन्ही देशांना आपल्या अंतिम लष्करी मोहिमा पूर्ण करण्यासाठी एक मार्ग देण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांना सन्माननीय मार्गाने युद्धविराम लागू करता येईल.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्राइलमधील युद्धविरामाची घोषणा केली असली तरी अद्याप या भागातील वातावरण तणावपूर्ण आहे. इस्राइली सैन्याने तेहरानमधील काही भागातून नागरिकांना बाजूला होण्याचा इशारा दिला आहे. तर दक्षिण गोलान टेकड्यांच्या परिसरात ड्रोन आणि विमानांपासूनच्या संभाव्य धोक्याचा बिगुल वाजवण्यात आला आहे. इस्राइलने तेहरानमधील एविन तुरुंग आणि इतर सरकारी कार्यालयांना लक्ष्य केलं आहे. अशा परिस्थितीत युद्धविरामाच्या घोषणेमुळे खरोखरच शांतता प्रस्थापित होणार की गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये हा एक अल्पविराम ठरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIsraelइस्रायलIranइराण