शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 19:23 IST

Israel-Hezbollah War: इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.

Israel-Hezbollah War: गेल्या काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर हिजबुल्लाहचा नवा प्रमुख हाशेम सैफुद्दीन हा सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. सैफुद्दीनला मारण्यासाठी इस्रायलने दक्षिण बेरूतमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.

दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास २७ सप्टेंबर रोजी इस्रायलने बेरूतसह हिजबुल्लाहच्या सर्व ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यावेळी इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने दावा करण्यात आली की, त्यांनी हिजबुल्लाह संघटना जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली आहे. हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र साठा नष्ट करण्याचा दावाही इस्रायलने केला आहे. यानंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि त्याची मुलगी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची बातमी समोर आली. याबाबत हिजबुल्लाहकडून दुजोरा देण्यात आला नव्हता. 

नसराल्लाहचा मृत्यू कसा झाला?मीडिया रिपोर्ट्समध्ये हिजबुल्लाहच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला होऊनही हसन नसरल्लाह वाचला आहे. या रिपोर्टनंतर इस्रायली संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर नसराल्लाह जिवंत राहू शकेल, यावर त्यांचा विश्वास नाही. सध्या इस्रायल नसराल्लाह यांच्या मृत्यूची चौकशी करत आहे. या वक्तव्यानंतर काही तासांनी इस्रायलने नसराल्लाहचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्याच्या वेळी नसराल्लाह मुख्यालयाऐवजी दुसऱ्या इमारतीत लपला होता, जिथे इस्रायली हल्ल्यानंतर पसरलेल्या विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला.

मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या चार दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव जगभर दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांना उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य करत आहेत. इस्रायलकडून हवाई हल्ले झाले तर इराण बदला घेण्याची एकही संधी सोडणार नाही. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय